वचन ते पूर्ण! काम हेच ओळख!
राजगुरुनगरला नगरपरिषद अस्तित्वात आल्यानंतर, अगदी कमी वयातही जनतेने शिवाजी नंदकुमार मांदळे यांच्यावर मोठा विश्वास दाखवत जबाबदारी दिली. भारतीय जनता पक्षाने त्यांना प्रथम दीड वर्ष नगरसेवक म्हणून आणि नंतर पुढील दीड वर्ष नगराध्यक्ष म्हणून संधी दिली.
या कार्यकाळात सर्वात महत्त्वाचे पाऊल म्हणजे नवीन पाणीपुरवठा योजना—ज्यासाठी तब्बल ₹१८ कोटींचा निधी तत्कालीन पालकमंत्री स्व. गिरीशजी बापट यांच्या माध्यमातून राजगुरुनगरला मंजूर करण्यात आला. या निधीमुळे नळयोजनेचे काम वेगाने सुरू झाले.
ग्रामपंचायतीच्या काळातील जवळपास ₹२ कोटींच्या विजबिलाच्या थकबाकीचा अटथळा होता. हा प्रश्न तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोडवला आणि त्यामुळे प्रकल्पाला गती मिळाली.
आज शहरातील पाण्याबाबतची तफावत, तक्रारी आणि ओरड—हे सर्व पुढील तीन महिन्यांत पूर्णपणे संपणार!
राजगुरुनगर शहराला पूर्ण दाबाने, स्वच्छ, शुद्ध आणि अखंडित पाणी मिळणार आहे.